‘डिअर एनसीबी, ती परत आलीये, चौकशीला कधी बोलवणार’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर राज्यात ड्रग्ज सेवनाचा मुद्दा प्रचंड गाजला. त्यातून राजकीय वादविवाद झाले. अजूनही या मुद्द्यावर पडदा पडलेला नाही. बॉलीवूड मधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची एनसीबीन ड्रग्ज प्रकरणात चौकशी करत आहेत.

त्यातच अभिनेत्री कंगना रणौत मंगळवारी मुंबईत दाखल झाली. मुंबईत दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्विट करत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनसीबीला सवाल करणार ट्विट केलं आहे. ‘आपण ड्रग्जच्या आहारी गेलो होतो,’ अशी कबूली देणारा कंगनाचा व्हिडीओ ट्विट करत भाजपालाही लक्ष्य केलं.

सावंत यांनी केलेल्या ट्विट मध्ये डिअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगनाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात? कंगनाला बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची माहिती द्यायची असल्यानं मोदी सरकारने तिला वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. मात्र, ती अजूनही माहिती लपवत आहे, जो की गुन्हा आहे, असं म्हटलं आहे.

भाजपा महाराष्ट्राची माफी मागणार का?
सचिन सावंत यांनी केवळ कंगनाच नाही तर भाजपलाही लक्ष्य केले. भाजपाने तिला (कंगना) झाशीची राणी म्हटलं आहे आणि महाविकास आघाडी सरकार तिला ही माहिती पोलिसांना देऊ देत नाही, असा आरोपही केला आहे. एनसीबीला माहिती देण्याची विनंती राम कदम आता कंगनाकडे करतील का? महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल भाजपा माफी मागणार का?,” असा सवालही त्यांनी केला आहे.