Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Congress |काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुका (Assembly elections) स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. पटोले यांच्या निर्णयाला आता काँग्रेस नेते संजय निरुपम (Congress leader Sanjay Nirupam) यांनी पाठिंबा दिला असून शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला (Congress) जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला (Shiv Sena) किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?, अशा सवाल निरुपम यांनी विचारला आहे. दरम्यान स्वबळाच्या मुद्द्यावर आता काँग्रेस नेते एकत्र येत असल्याने यावरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडणार अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

नाना पटोले ( Nana Patole) यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी देखील काँग्रेसचे कान टोचले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, काँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जात आहे. पण मला वाटत काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. नाना पटोलेंच्या निर्णयाला माझी सहमती आहे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरची झोंबायचे कारण काय अशी खोचक टीका निरुपम यांनी केली आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. 25) काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत असून नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : congress leader sanjay nirupam criticized the shivsena uddhav thackeray

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास