पानिपतचे युद्ध पराभवासाठी ओळखले जाते ; निरुपमांचा शहांना टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमित शहा यांनी काल भाजपच्या महाअधिवेशनात पानिपताच्या युद्धाला सामोरे ठेवून देशाच्या जनतेला भाजपला मतदान करण्यासाठी आकर्षिक केले होते त्यावर मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी अमित शहा यांना लक्ष केले आहे. पानिपतचे युध्द् पराभवासाठी ओळखले जाते असे संजय निरुपम यांनी म्हणले आहे. संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर वरून या आशयाचे ट्विट केले आहे.

अमित शहा यांनी काल महाअधिवेशनात पानिपतच्या लढाईचा उल्लेख करून देशाला भाजपला मतदान करण्यासाठी आवाहन केले होते परंतु याला संजय निरूपम यांनी चांगलेच उचलून धरले आहे. पानिपत हे विजयाचे नाही तर पराभवाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून अमित शहा यांना भाजपच्या पराभवाची धास्ती वाटते का असे संजय निरुपम यांनी भाजपला विचारले आहे.

नेमके काय म्हणाले होते अमित शहा 

पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे उदाहरण देत अमित शहा यांनी पानिपतावर मराठे हारले आणि देश २०० वर्षे मागे गेला आता हि तशीच वेळ आली आहे. आपण नेतृत्व नसलेल्या आणि नेता नसलेल्या पक्षाला मतदान केल्यास देश पुन्हा काही वर्षे मागे जाईल असे अमित शहा यांनी म्हणले आहे. या देशावर काँग्रेसने ७० वर्षे राज्य केले मात्र या देशाचा विकास त्या मानाने झाला नाही. देशाचा विकास आणि देशाचा गौरव या पाच वर्षात वाढला आहे. २०१४ साली आम्हाला सत्ता मिळाली तेव्हा भाजपची ६ राज्यता सत्ता होती आता १६ राज्यात भाजप सत्तेवर आहे असे अमित शहा म्हणाले काल म्हणाले होते. तर देशाच्या गतिमान विकासासाठी आपण नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत बसवा असे आवाहन अमित शहा यांनी काल केले होते.

काय आहे पानिपतच्या युद्धाचा इतिहास 

१४ जानेवारी १७६१ रोजी मराठा सैन्य आणि अहमद शहा अब्दाली याच्या सैन्यात आजच्या हरियाणा राज्यातील पानिपत येथे भीषण युद्ध झाले होते. युद्ध एवढे भीषण होते कि या युद्धाची जगाच्या इतिहासाने नोंद घेतली आहे. हे युद्ध अहमद शहा अब्दालीच्या विजयापेक्षा मराठ्यांच्या पराभवामुळे अधिक प्रसिद्ध झाले कारण मराठ्यांचा युद्धात लढण्याचा आवेश बघून स्वतः अब्दाली थबकला होता. त्याने हि रणावर सांडलेल्या मराठ्यांच्या शौर्याला तत्कालीन पत्राद्वारे गुणगौरवीत केले आहे. या युद्धात मराठ्यांना देशातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संस्थानिकांनी मदत केली नाही. भरतपूरचा राजा सुरजमल जाठ आणि अयोध्येचा नवाब सुजाउद्दोला यांनी मराठ्यांना ऐन वेळी मदत नाकारली. फक्त पटयालाचे राजे अलुवालिया यांनी उपाशी मरणाऱ्या मराठा सैन्याला धान्यांची रसद पुरवली.

जसे मराठे एकटे पडल्याने युद्ध हारले आणि  देशावर इंग्रजांची हुकूमत आली. तसेच देश या पराभवामुळे २०० वर्ष मागे गेला. तसे आम्हाला एकटे पाडून देशाचे नुकसान करू नका इतिहासातून हा धडा घ्या असे अमित शहा यांना काल म्हणायचे होते. तर आज त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच खिल्ली काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उडवली आहे.