SSR Case वरून काँग्रेस नेत्याचा राऊतांवर निशाणा, म्हणाले – ‘प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपली आहे. सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव विनाकारण गोवण्यात येत असल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी सुशांतच्या कुटुंबालाच टार्गेट केले. यावरून आत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, शिवसेना खासदार संजय राऊत सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाबद्दल खुजी भाषा वापरत आहेत. प्रत्येक कुटुंबात काहीतरी कहाणी असते, शिवसेनेवाल्यांच्या तर अनेक आहेत. पण सुशांत सिंगचा मृत्यू हा एक संवेदनशील विषय आहे. शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी ना की खुजेपणा अशा शब्दात निरुपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते राऊत ?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे काहीच कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हेत. त्याच वडिलांना फुस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईत आले, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते.