…म्हणून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मागितली पंतप्रधान मोदींची माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सत्याग्रह केल्याचे म्हटले होते. त्यावेळी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘बांगलादेशलाही मोदी फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत’, असे म्हटले होते. मात्र, आता त्यांनी त्यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदींची माफी मागितली आहे.

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील ढाकाजवळील सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिले होते. त्यानंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले होते, की ‘आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. मी तेव्हा 20 ते 22 वर्षांचा असेन. ते माझे पहिलेच आंदोलन होते. त्यावेळी मला अटक झाली होती. मी तुरुंगवासही भोगला होता’. मोदींच्या याच वक्तव्यावरून थरूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

शशी थरूर यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी याची कबुली दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींना सॉरी म्हटले. ‘माझी चूक असेल तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे हेडिंग आणि ट्विट वाचून ट्विट केले होते. बांगलादेशला स्वातंत्र कोणी मिळवून दिले हे सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांनी सॉरी म्हणत माफी मागितली’.

काय होतं शशी थरूर यांचं ट्विट

आंतरराष्ट्रीय शिक्षण…आपले पंतप्रधान भारतीय फेक न्यूजचा आस्वाद बांगलादेशला देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की बांगलादेशला कोणी स्वातंत्र्य मिळवून दिले, असे ट्विट करत टीका केली होती.