विदर्भात शिवसेनेकडून भाजपला ‘शह’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा राज्यामध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला. लोकसभेनंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते मंडळींनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. सध्या महायुतीचे वारे असल्याने अनेक नेते पक्षाला सोडून महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच विदर्भातील नेते आणि काँग्रेसचे २५ वर्षे मंत्री राहिलेल्या सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

लोकसभेपूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यातच आता काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलाने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आज प्रवेश करणार आहेत. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामुळे विदर्भात शिवसेनेला बळकटी मिळेल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दुष्यंत यांच्या शिवसेना प्रेवशाआधारे शिवसेनेने विदर्भात भाजपाला शह दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोण आहेत दुष्यंत चतुर्वेदी ?

दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य आहेत. तसेच ते लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्तेचे विश्वस्त असून या संस्थेच्या नागपूर आणि मुंबईत २८ शाळा आहेत. या शाळांमध्ये दोन हजार शिक्षक काम करतात तर २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुष्यंत चतुर्वेदी हे आज शिवसेनेत प्रवेश करून शिवबंध बांधणार आहेत.

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची हाकालपट्टी

विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नते आणि माजी मंत्री असलेल्या सतीश चतुर्वेदी यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना पक्षाने नोटीस पाठवून स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. मात्र, सतीश यांनी काँग्रेसच्या नोटीसीला उत्तर न दिल्याने नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल पक्षाला सादर केला. यानंतर सतीश यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.

आरोग्य विषयक वृत्त-

नंबर वाढला तर चष्म्याची लेन्स नियंत्रित करा, बदलण्याची गरज नाही

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा