SSR Death : ‘आदित्यजी चिंता नको, मुंबई पोलीस सक्षम की बिहार ? हे शेंबडं पोरगंही सांगेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलच तापल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणात काही जणांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनी देखील असा आरोप केला आहे. महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. तांबे यांनी म्हटले की, आदित्यजी, चिंता करू नका. सुशांत प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस हे शेंबडं पोरगंही सांगेल. असा टोला सत्यजित तांबे यांनी विरोधकांना लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. आदित्यजी, चिंता करु नका. जनता हुशार आहे. मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस ? हे शेंबडं पोरगंही सांगू शकेल.. आपण करत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, असे तांबे यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे कोण लोक आहेत, याची माहिती आपल्याकडे आहे. याचा लवकरच स्फोट होईल. सुशांतच्या प्रकरणात राजकारण होत आहे. पडद्यामागून पटकथा लिहिली जात आहे. हे राजकारण दळभद्री असून प्रतिमा मलीन करण्याचा डाव आहे. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंच्या दिशेने आरोपांच्या फैरी झाडत आहात त्यांनी लक्षात ठेवा, यात बदनाम महाराष्ट्राला करत आहात असे राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच हे संपूर्ण कारस्थान ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केले जात आहे. महाराष्ट्रा विरोधात कोण कारस्थान करत आहे. राजकारण करत आहे, कशा पद्धतीने राजकारण होत आहे आणि कोणत्या थराला जाऊन केले जात आहे. याचा लवकरच स्फोट होईल, खुलासा करण्यात येईल, असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like