काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण नव्हे तर ‘हे’ 2 दिग्गज घेणार मंत्रिपदाची शपथ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज होणाऱ्या शपथविधीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर एकूण 6 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील असे सांगण्यात आले होते. परंतू काँग्रेसकडून कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत संभ्रम होता. परंतू यावरून पडदा उठला आहे. काँग्रेसकडून आज होणाऱ्या शपथविधीत काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे शपथ घेणार आहेत.

सुरुवातीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे आज मंत्रिपदाची शपथ घेतील असे सांगितले जात होते. परंतू आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

बाळासाहेब थोरात यांना तर उपमुख्यमंत्रिपद मिळेल असे सांगितले जात होत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार यात शंका नव्हती. परंतू नितीन राऊत यांच्या गळ्यात काँग्रेसने मंत्रिपदाची माळ टाकली आहे. त्यामुळे नितीन राऊत यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे.

ही नावे जाहीर झाली असली तरी त्यांना नक्की कोणती मंत्रिपद मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आज राष्ट्रवादीचे दोन नेते म्हणजेच जयंत पाटील, छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील. तर शिवसेनेचे देखील दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेतील.

Visit : Policenama.com