मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील आठवड्यात 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतर दोन दिवसांचे विशेष अधिवेशन होऊन सरकारचे कामकाज सुरु झाले आहे. त्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे. पण काँग्रेसचे मंत्री अजूनही वेटींगवर असल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चार मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला. मंत्री छगन भुजबळ यांना ‘रामटेक’ बंगला देण्यात आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांना घराचे वाटप करण्यात आलं आहे.

पण काँग्रेस मंत्री अजूनही वेटींगवर असल्याने पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘सागर’ बंगला देण्यास काँग्रेसने विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई व डॉ. नितीन राऊत यांना अजून सरकारी बंगल्यांचे वाटप झालेले नाही.

Visit : policenama.com