नागपूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी नको, कॉंग्रेस नेत्यांची मागणी

नागपूर :  पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र असले तरी नागपूर महापालिकेची 2022 मध्ये होणारी निवडणूक (don’t make any alliance with NCP for Nagpur municipal corporation election) स्वबळावर लढवावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी (Congress leaders) केली आहे. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल ( NCP leader Praful Patel) यांनी देखील पक्ष कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करणार की स्वबळाचा पर्याय स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

नागपूर महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे निर्विवाद सत्ता आहे. महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आत्तापासूनच कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शहरात सहापैकी दोन जागा ताब्यात घेण्यात यश मिळाल होत. त्याचा फायदा हा महापालिका निवडणुकीत होऊ शकतो असा विश्वास कार्यककर्त्यांना आहे. 2017 च्या तुलनेत आजच्या घडीला काँग्रेस पक्ष मजबूत दिसत असल्यानेच निवडणुकीपूर्वी युती होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. काँग्रेसने 2012 ला सर्व पक्षांना साेबत घेऊन निवडणूक लढवली आणि 2017 ला स्वबळावर निवडणूक लढवली होती. दोन्ही निवडणुकांचा अनुभव चांगला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांना लढायचे असल्यास त्यांनी लढावे. मात्र, आम्ही महापालिकेत कशी सत्ता आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसचे महासचिव संदेश सिंगलकर यांनी सांगितले. नागपूर महापालिका हा भाजपचा गड समजला जातो. सध्या महापालिकेची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. महापौर संदीप जोशी महापालिकेचा कार्यभार पाहत आहेत.

You might also like