लातूरमध्ये काॅंग्रेस उमेदवारांमध्ये संभ्रम ; सर्व इच्छुकांच्या गुडघ्याला बाशिंग

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन ( विष्णू बुरगे ) – लातूरमध्ये काँग्रेसकडून लोकसभेचा उमेदवार घरचा की बाहेरचा असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण गेली अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी पक्षांकडे आपली उमेदवारी मागितली आणि त्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या, मुलाखतीही दिल्या. मात्र, अद्याप कोणालाही आपल्याला उमेदवारी मिळेल हे निश्चित झालेलं नाही.

लातूर ची जागा रिझर्व असल्यामुळे या ठिकाणी स्थानिक व्यक्तीला प्राधान्य मिळेल की बाहेरून येऊन कोणी निवडणूक लढेल हे सांगणं कठीण आहे. कारण ज्यावेळेस पक्षाला एखादा निर्णय घ्यायचा असेल, या ठिकाणाहून निवडणुकीत एखादा मोठा मातब्बर नेता निवडून द्यायचा असेल, तर लातूर हा काँग्रेसचा गड मानला जातो.

लातूरहून एक चांगला प्रतिनिधी नेता येईल अशी अपेक्षा काँग्रेसला असेल तर काही जणांचे म्हणणे आहे की, स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवारी मिळावी. आणि काही जणांचे म्हणणे आहे, काँग्रेसने दिलेला उमेदवार हा अनुभवी व्यक्ती असावा. मात्र, काँग्रेस कोणाला पसंदी देतो हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा – काँग्रेसच भाजपची ‘बी टीम’ : आण्णाराव पाटील यांचा घणाघाती आरोप ! 

प्रकाश आंबेडकरांनी लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे मतदानामध्ये दलित आणि मायनॉरिटी याचा वंचित बहुजन आघाडी सेंद लावणार हे नक्की आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जाईल की नाही हे माहिती नाही. म्हणूनच काँग्रेस लातुरच्या उमेदवाराचा विचार लवकर करत नसल्याची चर्चा आहे.

यापुर्वी विलासराव देशमुख यांनी आवळे यांना उभं करून निवडूनही आणलं होतं. मात्र, ती परस्थिती सध्या नाही.
त्यामुळे बाहेरून आलेला उमेदवार या ठिकाणी काँग्रेसला ही परवडणारा नाही. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी याचा संभ्रम आहे.

दरम्यान, आचारसंहिता लागु झाली तरीही काँग्रेसने लातूरमध्ये लोकसभेचा उमेदवार जाहीर केला नाही. तसं पाहता नेहमीप्रमाणेच काँग्रेसकडून ऐनवेळी लातूर चा उमेदवार जाहीर केला जातो. याची पुनरावृत्ती याहीवर्षी होत असल्याचे दिसत आहे.