home page top 1

Video : मोदी सरकार 2.0 च्या ‘सेंच्युरी’वर काँग्रेसचा ‘व्हिडिओ’

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर पुन्हा सत्‍तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिले 100 दिवस पूर्ण झाल्याने काँग्रसने मोदी सरकारच्या निर्णयांची खिल्‍ली उडविणारा एक व्हिडिओ ट्टिरवरून प्रसिध्द केला आहे. गेल्या 100 दिवसांमध्ये नेमकं सरकारनं काय केलं हे काँग्रेसच्या दृष्टीने व्हिडिओमधून सांगण्यात आलं आहे.

काल (शनिवार) मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांना मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलेले आहे. अलिकडील काळात अर्थव्यवस्थेची स्थिती खालावत जात आहे हे वास्तव असुन कोणालाही नाकारता येणार नाही. मंदीमुळं हजारो नोकांना त्यांच्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. बेरोजगारी त्यामुळं अधिकच वाढली आहे. बांधकाम उद्योग, वाहन उद्योग क्षेत्रात तर प्रचंड मंदी आहे.

ती सर्वांनाच जाणवत देखील आहे. वाहन क्षेत्रातील मंदीमुळं वाहन कंपन्यांनी वाहनांची दर मोठया प्रमाणात कमी देखील केले आहेत. सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांवरून काँग्रेसनं त्यांची टर उडवली आहे. देशाची आर्थिक स्थिती, बेरोजगारी, भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे असे एकुण शंभीर मुद्दे एकत्र करून काँग्रेसनं व्हिडिओ तयार केला आहे.

 

Loading...
You might also like