काँग्रेसच्या गटनेतेपदासाठी ‘या’ 5 बड्या नेत्यांची नावं चर्चेत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड करण्यासाठी आज मुंबईत महत्वाची बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना गटनेतेपदी निवडल्यानंतर आता काँग्रेसने आपला नेता निवडण्याची तयारी सुरु केली आहे. आज दुपारी 1 वाजता काँग्रेस भवनात हि बैठक होणार असून अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 44 आमदार विजयी झाले असून या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांसारखे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या पदासाठी सध्या पाच नावे आघाडीवर असून यामध्ये नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, तसेच विजय वडेट्टीवार या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बड्या नेत्याला व्यक्त करावी लागली दिलगिरी
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकींनंतरच्या निकालावर प्रतिक्रिया देताना थेट काँग्रेस हायकमांडवर टीका केली होती. त्यामुळे त्यांना याविषयी दिलगिरी देखील व्यक्त करावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हि दिलगिरी व्यक्त केली होती. काँग्रेस हायकमांडने राज्यात जास्त लक्ष दिले नाही. त्यामुळे राज्यात काँग्रेसच्या जागा कमी आल्या, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावरून त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली.

Visit : Policenama.com