Nitin Raut | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी मराठा आरक्षण Maratha reservation आणि मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणावरून त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संतप्त सवाल खडा केला आहे.
राज्यात मराठा समाजाला Maratha society आरक्षण मिळालेच पाहिजे त्याला विरोध नाही परंतु, अजून पण आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत,
आम्ही काय भिकारी आहोत का? असा खणखणीत प्रश्न काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Congress Minister Nitin Raut) यांनी उपस्थित केला आहे.
नितीन राऊत (Nitin Raut) हे आज मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी आक्रमक होऊन खडेबोल सुनावले आहेत.

आज (शुक्रवारी) ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) हे मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आले असता त्यावेळी त्यांनी जोरदार सवाल केला आहे.
यादरम्यान ते पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे. एनटी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते जाणून घेणार असल्याच नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितलं आहे.
त्यावेळी नितीन राऊत म्हणाले, आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे, तेच आम्ही मागतो आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही.
मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये.
आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही,
अशी भूमिका घेऊ नये, असा घणाघात देखील राऊत यांनी केला आहे.

यादरम्यान, काही दिवसांअगोदर ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेला जीआर (GR) रद्द होणार असल्याचे स्पष्ट करत, कायदेशीरबाबींचा अभ्यास करून या प्रश्नावर तोडगा काढणार आहे असे राऊत यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
राज्य सरकारकडून 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती.
परंतु, याबाबत निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली होती त्या समितीमध्ये विश्वासात घेण्यात आले नव्हते.
या कारणामुळे अनेकांकडून संताप दिसून येत होता.

Gautam Adani Income | ‘बुलेट’च्या स्पीडनं संपत्तीत वाढ ! गौतम अदानी यांनी यावर्षी दररोज कमावले 2000 कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांमुळे मोठी कमाई