‘कोरोना’ लस मोफत म्हणजे भाजपाचा चुनावी ‘जुमला’, मंत्री यशोमती ठाकूर संतापल्या

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने (Bjp) बिहारमधील जनतेला कोरोनाची (Coronavirus) लस (Vaccine) मोफत (free) देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या घोषणेनंतर विरोधकांनी भाजपला टार्गेट करण्यात येत आहे. आता त्यात काँग्रेस (congress) फायरब्रँड नेत्या आणि राज्याच्या महिला-बालकलण्याण मंत्री (minister) यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी खोचक टीका केली आहे.

बिहारमध्ये कोरोना लस मोफत वाटणे म्हणजे भाजपचा चुनावी जुमला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. भाजप देशात भेदभाव करत असून इतर ठिकाणी जनावरे राहतात का ? असा संतप्त सवालही यशोमती ठाकूर यांनी केला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोरोना लसीचं राजकारण करत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

कोरोना लशीबाबत केंद्रीय मंत्र्याच मोठं विधान
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला सत्तेत आल्यावर मोफत लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात कोरोना लसीवर पुन्हा एकदा गदारोळ सुरु झाला आहे. विरोधी पक्षांसह अनेक राज्यातील राज्य सरकारांनी केंद्र सरकारच्या या आश्वासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारला घेराव घातला. कोरोना लसीसंदर्भात वाढलेला राजकीय संघर्ष पाहता आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी मोठं विधान केलं आहे.

केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी सांगितले की, बिहारच नाही तर देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळणार. ओडिशाच्या बालासोरमध्ये केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी म्हणाले की याविषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा सुरु आहे. साधरण एका व्यक्तीला कोरोनाची लस देण्याचा खर्च साधारण 500 रुपये आहे. बालासोरमध्ये पोट निवडणूक होणार असून प्रताप सारंगी तेथे प्रचारासाठी गेले होते तेव्हा त्यांनी या संदर्भात मोठं विधान केल्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.