सोनिया गांधी यांनीच अमित शहा यांना सोहराबुद्दीन प्रकरणात गुंतवले – स्मृती इराणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोहराबुद्दीन प्रकरणात सोनिया गांधी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतो. न्यायालयाच्या निकालामुळेच काँग्रेसचे सुप्त मनसुबे धुळीस मिळाले आहेत त्याच प्रमाणे अमित शहा यांना काँग्रेसने तडीपार हि म्हणले होते काँग्रेसच्या या कूटनीतीवर पाणी फेरण्याचे काम न्यायालयाने केले आहे असे स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.

अमित शहा यांना राजकीय कोडी करण्यासाठीच काँग्रेसने त्यांच्यावर हि खेळी केली होती. त्याच प्रमाणे भाजपच्या स्वच्छ प्रतिमेवर चिखल फेकण्यासाठी काँग्रेसने सत्तेच्या काळात दुरुपयोग केला आहे पण काँग्रेसचा हा सर्व आटापिटा धुळीस मिळाला आहे असे स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.

सोनिया गांधी यांनी राजकीय कट करून अमित शहा यांना सीबीआयच्या सहाय्याने सोहराबुद्दीन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आठ वर्षांपासून हे प्रकरण सुरु होते त्याचा आता निकाल लागला आहे. या प्रकरणाचा अमित शहा यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागला आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना मानहानीच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तरी अमित शहा यांनी हे सर्व सहन केले त्याच प्रमाणे भाजपच्या नेत्यांनी हि अनेक बाबी काँग्रेस सरकारच्या काळात सहन केल्या आहेत. मात्र न्यायालयाने काँग्रेसचा मनसुबा चांगलाच उधळून लावला आहे. काँग्रेसच्या मदतीने सीबीआयने अमित शहा यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी आपले वर्तन सुधारावे असेही स्मृती इराणी यांनी म्हणले आहे.

लोकसभेची निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे. तस तशी काँग्रेस आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपाचे युद्ध चांगलेच रंगात येऊ लागले आहे. तर काँग्रेसला त्यांच्या सरकारच्या काळात घडलेल्या चुकांच्या दृष्टीने घेरण्याचा भाजपने पुन्हा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेसला भ्रष्टाचाराचा मुद्दा सापडत नसल्याने काँग्रेस त्यांच्या विरोधात सतत राफेर कराराच्या मुद्द्यावर टीका करत असते. तर भाजपच्या सरकारच्या काळात लोकांची कामे कशी केली याचा पाढा भाजपचे नेते आता जनते पुढे वाचू लागले आहेत.