आमदार अमित देशमुख उतरले रस्त्यावर..

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूर शहरातील गाळे धारकांच्या भाड्यात यावर्षी कमालीची वाढ करण्यात आली आहे. ती भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेस च्या वतीने महानगपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महानगर पालिकेच्या दरवाढीच्या विरोधात आमदार अमित देशमुखही आज महानगरपालिकेत धडकले.

हेही वाचा – ‘त्या’ भाजप लोकप्रतिनिधीची ‘अश्लील क्लिप’ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ 

गाळे धारकांवर करवाढ करून जो अन्याय महानगर पालिका प्रशासन करत आहेत. तो अन्याय तात्काळ थांबवावा. या करवाढ संदर्भात विशेष सभा घेऊन भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. काॅंग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात शहरातील व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मनपा विरोधी पक्ष नेते दीपक सुळ ही यावेळी हजार होते.

यावेळी अमित देशमुख म्हणाले, गाळे धारकांची करवाढ रद्द करावी. असा अन्याय व्यपाऱ्यांवर व नागरिकांवर सत्ताधाऱ्यांनी करू नये अन्यथा काँग्रेसशी गाठ आहे. विशेष सभा बोलवून तत्काळ करवाढ मागे घ्यावी. असा सल्लाही सत्ताधाऱ्यांना आमदार अमित देशमुख यांनी दिला.