‘घोडे’बाजार तेजीत ! काँग्रेसचा सावध पवित्रा, शिवसेनेपाठोपाठ आमदारांना घेतलं बोलावून !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप-शिवसेनेत सत्ता स्थापनेवरुन संघर्ष सुरु झाल्यानंतर आता राजकीय पेच वाढला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतल्याने आता काँग्रेसने देखील फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेऊन आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. काँग्रेस असा निर्णय घेणार नाही असे काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार यांनी सांगितले होते. परंतू शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसने देखील सावध पवित्रा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप वड्डेटीवार यांच्याकडून भाजपवर करण्यात आला होता.

शिवसेनेचे आमदार रंगशारदा या हॉटेलमध्ये थांबले आहेत. परंतू मुंबईतील आमदार मुंबईत राहणार नाहीत असे देखील सांगण्यात येत आहे. राज्यातील आमदार हळूहळू जमू लागल्याने भाजप आता काँग्रेसच्या आमदारांना संपर्क साधत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. त्यामुळे सावधगिरी म्हणून काँग्रेसने देखील आपल्या आमदारांना मुंबईत बोलावल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप शिवसेनेत दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपद कोणाला हे अजून अस्पष्ट आहे. राज्यातील परिस्थिती अशी असताना रोज संजय राऊत आणि सुधीर मुनगंटीवार विविध दावे करत आहे. काही दिवसांपासून सतत गोड बातमी मिळेल असे सांगण्यात येत आहे, परंतू सत्तेचा पेच अजून सुटेनासा झाला आहे. दरम्यान भाजपवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सत्ता स्थापनेचा सध्या पोरखेळ सुरु आहे, त्याला भाजप जबाबदार आहे. भाजप साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरत काँग्रेसमध्ये फोडाफोडीचा प्रयत्न करत आहे. मुनगंटीवार हे दररोज गोड बातमी मिळेल असे सांगतात. मात्र गोड बातमी मिळत नाही. कसली गोड बातमी, भाजपने तर महाराष्ट्राचं मॅटर्निटी हॉस्पिटल केलंय अशी खोचक टीका त्यांनी भाजपवर केली.

उद्धव ठाकरे म्हणाले
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची भूमिका समोर आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर अजूनही ठाम आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की मला स्वतःहून युती तोडायची नाही. भाजपने काय तो निर्णय घ्यावा. लोकसभेवेळी जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबर सगळं ठरलं होतं. सम-समान वाटपाचा फॉर्म्युला होता. युती कायम राहावी ही इच्छा आहे. मात्र भाजपने दिलेला शब्द पाळावा. ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देणार असेल तरच भाजपने मातोश्रीवर फोन करावा. परंतू उद्यापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यास राष्ट्रपती राजवट राज्यात लागू होऊ शकते. त्यामुळे सत्ता पेचावर काय तोडगा यावर चर्चा रंगली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like