राष्ट्रवादीकडून फलकबाजी ! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय, या देशात माझेच विचार चालतील’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे आजपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील विधानावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजपाला प्रतिउत्तर दिले आहे. हातात फलक घेऊन एकट्याने वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या ‘भारत बचाओ’ रॅलीच्या भाषणादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गांधींच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेत ‘मी पण सावरकर’ असलेल्या टोप्या घालून विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, भाजप आमदारांच्या या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी आमदार प्रकाश गजभिये यांनी एकट्याने आंदोलन केले. त्यांनी हातात एक छोटा फलक घेत, त्यावर “म. गांधींचा खून मी केला. मी नथुराम गोडसे बोलतोय. या देशात माझेच विचार चालतील” असा मजकूर लिहिला होता. या फलकबाजीद्वारे त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला असून या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/