लवकरच महाशिवाआघाडी अस्तित्वात येईल : प्रणिती शिंदे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सत्तास्थापनेवरून संभ्रम निर्माण झाला असतानाच लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात येईल असं सूचक विधान काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे.

महाशिवआघाडी विषयी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की , ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आत्ताच अनुमान लावणे चुकीचे आहे. मात्र, लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात आलेली पाहायला मिळेल.’

महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल येऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला आहे, मात्र अद्यापही सत्ता स्थापन झाली नाही. महाशिवआघाडी मिळवून सरकार बनवणार अशी चर्चा सुरु असतानाच सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल संभ्रम वाढवणारं विधान केलं होत.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार का, असं पवार यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर ‘भाजप आणि शिवसेनेला विचारा, ते एकत्र होते,’ शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते, असं ते म्हणाले.

Visit : Policenama.com