Congress MLA Praniti Shinde | प्रणिती शिंदेंची राज ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Congress MLA Praniti Shinde | गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मेळाव्या दरम्यान बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) हल्लाबोल केला आहे. तसेच मशिदीच्या भोंग्यांसमोर स्पीकर (Azaan On Loudspeaker) लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवा, असं भाष्य देखील केलं. यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी त्या सोलापुरात (Solapur News) बोलत होत्या.

 

प्रणिती शिंदे (Congress MLA Praniti Shinde) म्हणाल्या की, ”मनसे ही भाजपला (BJP) सी टीम मिळाली आहे. एकेकाळी भाजप विरोधात ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणारे त्यांचे गुणगान गात आहे. निवडणुकीदरम्यान हे सर्व मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे मागे टाकतात. महागाई सारखी मुद्दे सोडून असे मुद्दे धरायचे याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करत असल्याची,” टीका देखील त्यांनी केली आहे.

 

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, ”केंद्रीय यंत्रणेचा काँग्रेस सरकारने कधीही दुरुपयोग केला नाही.
केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करण्याची काँग्रेसची संस्कृती नाही.
ईडी एक मोठी संस्था आहे. कुणी काहीही केले तरी ईडी आणतात. कोल्हापुरातही चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते, पेटीएम केले तरीही ED आणू. यातून भाजप वाल्यांसाठी ईडी काम करते हे स्पष्ट होत असल्याची,” टीका देखील त्यांनी केली.

 

Web Title :- Congress MLA Praniti Shinde | congress mla praniti shinde criticize mns president raj thackeray in solapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा