काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून पुन्हा एकदा महायुतीचे पुन्हा सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करवा लागला असून काही उमेदवारांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी राज्यात सर्वाधिक मतं मिळवली आहेत. सर्वाधिक मतं घेण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. कदम यांनी 1 लाख 62 हजार 521 मताधिक्य मिळवून विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं कुणालाही पडलेली नाहीत. तर नोटाला मतदारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली आहेत. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते हे 8 हजार 976 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ
1. कदम विश्वजीत पतंगराव (काँग्रेस) – 171497 विजयी झालेले उमेदवार
2. राहुल शिवाजी पाटील (बहुजन समाज पार्टी) – 941
3. संजय अनंदा विभुते (शिवसेना) – 8976
4. अधीकराव संपत चन्ने (जनता पार्टी) – 323
5. अजिंक्यकुमार वसंत कदम (अपक्ष) – 715
6. अनील बाळा किणीकर (अपक्ष) – 188
7. संदीप रामचंद्र जाधव (अपक्ष) – 408
8. अ‍ॅड. प्रमोद गणपतराव पाटील (अपक्ष) – 2132
9. विलास शामराव कदम (अपक्ष) – 706
10. नोटा – 20631

टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com