काँग्रेसच्या आमदारांचा जयपूरचा ‘मुक्काम’ हलणार, मुंबईला परतणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घोडेबाजार होऊ नये, यासाठी आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांची हॉटेलमध्ये बडदस्त ठेवली होती. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता या आमदारांनाही सुटका होणार आहे. गेले आठवडाभर जयपूरला मुक्काम ठोकून असलेले काँग्रेसचे आमदार आज मुंबईला परतणार आहेत. त्याचवेळी मालाडमधील हॉटेलमधील शिवसेना आमदारांना त्यांच्या घरी परतण्यास अद्याप आदेश न मिळाल्याने त्यांचा मुक्काम वाढला आहे.

राजस्थानात काँग्रेसचे सरकार असल्याने भाजपाला आमदारांची फोडाफोडी करता येऊ नये, यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरमधील हॉटेलमध्ये एकत्रित ठेवले होते. आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने या आमदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे.

काँग्रेस श्रेष्ठीनी वेळेत पाठिंब्याचे पत्र न दिल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने काँग्रेसचे आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत. काही आमदारांनी रविवारी रात्री काही आमदारांनी अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधून आम्ही वेगळा गट करायला तयार आहोत. तुम्ही सरकार बनवा असे सांगितल्याचे कळते.
त्यामुळे आता काँग्रेसचे हे आमदार मुंबईत आल्यानंतर याबाबतची त्यांची भूमिका आणखी स्पष्टपणे सर्वासमोर येणार आहे. काँग्रेसने पाठिंबा दर्शविण्यास उशीर केला तर काँग्रेसचे बहुतांश आमदार वेगळा गट तयार करुन शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. या आमदारांच्या दबावामुळे आता काँग्रेसला लवकरात लवकर किमान समान कार्यक्रम तयार करुन निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com