विखे पाटलांबरोबर ४ काँग्रेसचे आमदार दिनांक ६ जून नंतर करणार भाजपमध्ये प्रवेश

६ जूननंतर होणार प्रवेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केले होते. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने राष्ट्रवादीने जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि विजयी झाले. नाराज राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. विखे यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदारदेखील भाजपामध्ये प्रवेश करणार असून ६ जूननंतर त्यांचा भाजपात प्रवेश होईल असे सांगण्यात येत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दलु सत्तरा हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन भाजपा प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याच्या वृत्तास अब्दुल सत्तार यांनी दुजोरा दिला आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारी द्यावी, अशी सत्तार यांची मागणी होती. मात्र, औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. झांबड यांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व पक्षश्रेष्ठींनी कायम ठेवल्याने सत्तार यांनी नाराजी व्यक्‍त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. याचा फायदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झाला.

भाजपा प्रवेशासंबंधी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, राधाकृष्ण विखे यांच्या लोणी येथील निवास्थानी बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होणार असून मोदींचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर ही चर्चा होणार आहे. १ ते ६ जूनदरम्यान ही बैठक होण्याची शक्यात असल्याची त्यांनी सांगितले.