काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचं डोकं फिरलंय ; पंतप्रधानांना अप्रत्यक्षपणे शिवीगाळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांनी एका सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. परंतु यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. अतिशय खालच्या पातळीला जात त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवरून ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी एअर स्ट्राईवरूनही मोदींवर टीका केली. मुंगीही मारली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका सभेत बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये हल्ला केला त्यानंतर सांगितले की, त्यात 350 दहशतवादी मारले गेले परंतु तेथे साधी एक मुंगीसुद्धा मारली गेली नाही. इतकं लबाड हे सरकार आहे. हा सगळा भावनांचा खेळ आहे” असे राठोड म्हणाले. पुढे बोलताना मात्र त्यांनी आपली पातळी सोडून खालच्या शब्दात मोदींवर आपली तोफ डागत अतिशय बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. पुढे बोलताना राठोड म्हणाले की, “लोकांच्या भावनेला हात घालायचा सगळे विषय विसरून जायचे आणि पुन्हा एकदा मग मोदी.. मोदी.. मागून घाला त्या मोदीला” असे म्हणत त्यांनी पातळी सोडून अर्वाच्य भाषेत मोदींवर टीका केली आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कालपासून आचारसंहितादेखील लागू झाली आहे. निवडणूक म्हटलं की राजकीय पक्षांमध्ये
आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात होते. आरोपांच्या फैरी झडताना दिसायला लागतात. अशातच अनेक नेते आरोप करताना आपली पातळी सोडत खालच्या थराला जाऊन एकमेकांवर टीका करतात. हरिभाऊ राठोड यांचे हे वक्तव्य म्हणजे असाच प्रकार आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

शरद पवारांना आपला पराभव दिसला म्हणून त्यांनी माघार घेतली

शरद पवारांच्या माघारीनंतर माढ्यात मोहिते पाटील की प्रभाकर देशमुख

निवडणुकांसाठीच एअर स्ट्राइक ; काश्मीरच्या ‘या’ माजी मुख्यमंत्रांचा आरोप

काकू, राफेलची फाईल हरवली आहे, कुठे मिळते का बघा ? ठाण्यात पोस्टरबाजी