Congress Mohan Joshi | तरुणीवरील घातक हल्ला; प्रबोधना बरोबरच पोलीस दलात वाढ हवी – मोहन जोशी

पोलीसनामा ऑनलाइन – Congress Mohan Joshi | पुण्यातील मध्यवस्तीत तरुणीवर भर दिवसा कोयत्याने हल्ला (Attack On Girl In Sadashiv Peth Pune) होण्याचा प्रकार धक्का देणारा असून या मुलीचे प्राण वाचवणार्‍या तरुणांचे मन:पूर्वक अभिंदन करतो. असे आपत्तीजनक प्रसंग घडले की बघ्यांची गर्दी जमते. मदतीसाठी कोणी पुढे येत नाही. अशा पार्श्वभूमीवर या तरुणांनी पुढाकार घेऊन माथेफिरूला कोयत्यासह पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले हे उचितच आहे आणि कौतुक करण्यासारखे देखील आहे.असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हणले आहे. (Congress Mohan Joshi)

पुणे शहराचा मोठा विस्तार होत असताना शहर पोलिसांना ,पोलीसदल कमी पडत आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने पुण्यातील पोलीस ठाणी ,पोलीस चौक्या व पोलिसांच्या संख्येत तातडीने त्वरित वाढ केली पाहिजे. तसेच २४*७ छोट्या मोठ्या रस्त्यांवर गस्त घातली पाहिजे. शाळा ,कॉलेजांमध्ये अथवा कामाच्या ठिकाणी देखील महिलेस कोणी त्रास देत असेल अथवा धमकी देत असेल तर त्याची तातडीने पोलीस कम्प्लेंट नोंदवली जावी समाजाने देखील आत्मपरीक्षण करून असे प्रसंग घडू नये यासठी मोठ्या प्रमाणात युवकांचे प्रबोधन करावे. (Congress Mohan Joshi)

जागरूक पोलीस आणि जागरूक नागरिक यांच्या एकत्रित प्रयात्नातुनच असे आपत्तीजनक प्रसंग टळतील.पुणे महानगर पालिकेने देखील युवतींना स्व सव्रक्षणासाठी कराटेचे मोफत प्रशिक्षण द्यावे असे मोहन जोशी म्हणाले.

Web Title :  Congress Mohan Joshi | Fatal assault on young woman; Along with enlightenment, the police force needs to increase – Mohan Joshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा