Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय ही 2024 मधील केंद्रातील सत्तापालटाची नांदी – मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने निर्विवाद बहुमत संपादन केले ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील (LokSabha Election 2024) सत्तापालटाची नांदी आहे .केंद्रतील अपयशी मोदी सरकार (Modi Govt) आणि कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) भ्रष्टाचारी व अकार्यक्षम सरकार यांविरुद्चा एकत्रित रोष कर्नाटकातील मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला हे या निकालावरून दिसून येते.जनतेच्या खर्‍या प्रश्नांच्या कडे दुर्लक्ष करीत केवळ धार्मिक उन्माद वाढविण्यावर भाजपाने भर दिला .धनसंपत्तीचा मोठा वापर केला.

मात्र, महागाई, बेरोजगारी या बरोबरच महाभयानक भ्रष्टाचार याला विटलेला कर्नाटकातील मतदार या धार्मिक उन्मादाला बळी पडला नाही. भ्रष्ट्राचारी जनविरोधी ,सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून दूर फेकले, त्याबद्दल कर्नाटकच्या जनतेला मी धन्यवाद देतो. त्या बरोबरच यु पी ए अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi), कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (MP Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) सर्व पदाधिकारी आणि कर्नाटक राज्यातील कॉंग्रेस नेते व कार्यकर्ते यांचे अभिनंदन करतो. (Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election)

अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीने या निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदार संघातील आठ विधानसभा मतदार संघांची जबाबदारी निरीक्षक म्हणून माझ्यावर सोपवली होती.गेले 2 महिने अधिकाधिक वेळ मी त्यासाठी दिला .या मतदार संघात आठ पैकी पाच मतदारसंघात कॉंग्रेस पक्ष विजयी झाला याबद्दल चिकोडी लोकसभा मतदार संघातील मतदारांचे मी विशेष आभार मानतो. (Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election)

 

‘ऑपरेशन लोटस’चा (Operation Lotus) विचारही भाजपा करू शकणार नाही .एव्ह्ढे घवघवीत यश कर्नाटकातील मतदरांनी कॉंग्रेसला दिले आहे .कॉंग्रेस पक्ष हा विश्वास सार्थ ठरवेल हे निश्चित !

माजी आमदार मोहन जोशी (उपध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी)
Former MLA Mohan Joshi (Vice President, Maharashtra Pradesh Congress Committee)

 

Web Title :- Congress Mohan Joshi On Karnataka Assembly Election | Congress victory in Karnataka heralds coup at Center in 2024 – Mohan Joshi

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – पत्नी आणि सासरच्यांकडील लोकांच्या छळामुळे
तरुणाने केली आत्महत्या; पत्नीने बनावट कागदपत्राद्वारे घर, जागा बळकाविली

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’,
मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

NCP MLA Sunil Shelke Booked For Kishor Aware Murder | किशोर आवारे खून प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके,
त्यांचा भाऊ सुधाकर शेळके यांच्यासह 7 जणांविरूध्द FIR; जाणून घ्या फिर्यादीत नेमकं काय म्हंटलंय…

Narayan Rane |  ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर
जोरदार प्रहार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : सामाजिक सुरक्षा विभाग –
बंडगार्डनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर छापा, 8 जणांवर कारवाई

MP Shrikant Shinde | ‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, खा. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान (व्हिडिओ)