Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat | विकासाची दृष्टी असलेला नेता हरपला – मोहन जोशी

पुणे : Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat | पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. (Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat)

याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते.
पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले.
मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही.
हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल.
पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते
आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते.

पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली.
मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही.
समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला.
यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही.
त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.
(Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat)

Web Title :- Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat | A leader with a vision of development was lost

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Pune BJP MP Girish Bapat | आज गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं, आमचा मार्गदर्शक हरपला – चंद्रकांत पाटील

NCP MP Mohammed Faizal | शरद पवारांना दिलासा, राष्ट्रवादीच्या खासदाराला पुन्हा सदस्यत्व बहाल

Beed Crime News | माझं सगळ संपल माझ्या ताईला घेऊन जा असे म्हणत 13 वर्षांच्या मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल