पवारांनंतर राजीव सातव यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – शिवसेना आणि काँग्रेसला संमिश्र प्रतिसाद मिळणारा मतदारसंघ म्हणून हिंगोली मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या राजीव सातव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या १६३२ मतांनी विजय मिळवला होता. तर आगामी निवडणुकीत गुजरात राज्याचे प्रभारी असल्याचे कारण पुढे करत राजीव सातव यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

भाजपने गुजरातमध्ये फोडाफोडीचे तत्व राबवले असल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदार पदाचे राजीनामे देऊन भाजपमध्ये जात आहेत. अशा आव्हानाला तोंड देण्यासाठी सातव यांच्या नेतृत्वाचा कस पणाला लागत आहे. त्यामुळे राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षाचे काम पाहण्यासाठी आपण निवडणूक लढवत नाही असे म्हणले आहे. तर गुजरातमध्ये आपण काम करावे की हिंगोलीतून लोकसभा लढवावी याचा निर्णय आपण पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर सोपवला आहे असे राजीव सातव यांनी म्हणले आहे.

गेल्या खेपेला हिंगोली लोकसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत रोमांचकारी पद्धतीने समोर आला. काही फेऱ्यात राजीव सातव पुढे चालत होते तर काही फेऱ्यात शिवसेनेचे वानखेडे पुढे चालत होते. शेवटी १६३२ मतांनी राजीव सातव यांनी लोकसभेचे मैदान मारले. सध्या हुशार आणि अभ्यासू खासदार म्हणून राजीव सातव यांनी लौकिक मिळवला आहे. त्यांचा निवडणूक न लढण्याचा निर्णय हिंगोली मतदारसंघातील मतदारांना धक्का असल्याचे स्थानिकांनी म्हणले आहे.

ह्याही बातम्या वाचा –

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतला मोठा दिलासा 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन 

लातूरमध्ये काॅंग्रेस उमेदवारांमध्ये संभ्रम ; सर्व इच्छुकांच्या गुडघ्याला बाशिंग

पोलीस उपअधीक्षकाला गुंडांकडून मारहाणीचा प्रयत्न