Congress Nana Patole | आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही म्हणत नाना पटोलेंनी केली ‘ही’ घोषणा, शिवसेना-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले (Congress Nana Patole) यांनी मुंबई (Mumbai) पाठोपाठ पुण्यातही (Pune News) स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस पुण्यात आगामी महापालिक निवडणुका (Pune Municipal Elections 2022) स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील आणि शहरभरात पक्ष पोहोचण्यास मदत होईल, असे शहरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले (Congress Nana Patole) यांना सांगितले.

 

नाना पटोले यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. प्रदेश आणि शहराचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला होते. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी पटोले यांना सांगितले की, आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) निवडणुकीत मदत होत नाही, अनेकदा काँग्रेसच्या विरोधातही काम केले जाते. त्यामुळे आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही. (Congress Nana Patole)

 

काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले, यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात नव्हते, तर बारामती (Baramati) आणि शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या शहरातील काही बड्या नेत्यांनी, तर काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली. कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी अशाप्रकारे व्यथा मांडल्यानंतर पटोले यांनी पक्षाची स्वबळावर लढण्याची भूमिका असल्याचे सांगितले.

माजी मंत्री विश्वजित कदम म्हणाले, पक्षाची उमेदवारी देताना काटेकोर विचार व्हावा.
अनेकजण निवडणुकीतील उमेदवारीपुरते पक्षाकडे येतात. निवडणूक झाल्यानंतर अजिबात दिसत नाहीत.
त्यांच्यामुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अशांना उमेदवारी देण्यात येऊ नये.
पाच वर्षे पक्षाच्या झेंड्याखाली नियमित कार्यक्रम घेणार्‍यांचाच उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार व्हावा.

 

Web Title :- Congress Nana Patole | congress state president nana patole reaction on pune municipal corporation election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू

CM Eknath Shinde | ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण…’, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मागितली टाळी

Shivsena | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नवी कार्यकारिणी जाहीर