काँग्रेस, राष्ट्रवादीचे २० आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकमध्ये राजीनामा देणाऱ्या काँग्रेस आमदारांची संख्या आता १८ पर्यंत पोहचली असून गोव्यातील १५ काँग्रेस आमदारांनी भाजपला साथ देण्याचे निश्चित केले आहे. येत्या ऑक्टोंबरमध्ये महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका असल्याने येथील किती आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, याची चाचपणी काँग्रेस पक्षातून सुरु झाली आहे. त्यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० विद्यमान आमदार निवडणुका जाहीर होईपर्यंत भाजप किंवा शिवसेनेत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती दिवसेंदिवस भक्कम होत असताना काँग्रेसचे वारु स्थिरस्थावर होण्याचे नाव घेत नाही. पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नाही़ राहुल गांधी पुढील काळात नेमके काय करणार याची कोणालाच माहिती नाही. महाराष्ट्रात पक्षाची धुरा नेमकी कोणाकडे असेल हे सांगता येत नाही. पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सुरु केलेले राजीनामा नाट्य आता खालपर्यंत पाझरले असून प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस तसेच अन्य नेत्यांनी राजीनामे देण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. पक्ष नेमका सध्या कोठे आहे, पक्षात काय चालले आहे, याचा कोणाचा पायपोस कोणात नाही.

अशी काँग्रेसची अवस्था असल्याने तीन महिन्यांनंतर येणाऱ्या निवडणुकांना आपण कसे सामोरे जायचे याची चिंता काँग्रेसच्या आमदारांना लागून राहिली आहे. असेच सुरु राहिले तर, भाजप शिवसेना युतीपुढे आपली डाळ शिजेल का याची चिंता या आमदारांना वाटू लागली आहे. त्याचबरोबर मागील वेळी हुकलेली संधी यंदा पदरात पाडून घेण्यासाठी राज्य भरात असंख्य काँग्रेसचे माजी आमदार व नव्याने आमदार होऊ घातलेले नेते लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच तयारीला लागले होते. त्यांना आता नेमके काय करावे, हे कळेनासे झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिकीटावरुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेल्या घोळामुळे भाजपने संधी साधून राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्याकडे वळवून घेतले. त्यांना मंत्रीपदही दिले. शिवसेनेबरोबर भाजपची युती असली तरी अनेक ठिकाणी काँग्रेस आमदार हे गेल्या वेळी भाजप उमेदवारांचा पराभव करुन निवडून आले आहेत. लोकसभेप्रमाणे आपल्याला एक हाती बहुमत मिळावे, अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळे जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यासाठी ते निवडून येऊ शकतील अशा काँग्रेस आमदारांना यापुढील काळात गळ घालण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी आता काँग्रेसमध्ये काही राम राहिला नाही. काँग्रेसमध्ये राहिलो तर आपले सीट वाचण्याची शक्यता नाही असे अनेक आमदारांना वाटत आहे. मात्र, यातील काही आमदारांच्या जागा या शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या पक्षात जावे याविषयी आमदारांना संभ्रम आहे. त्यातूनच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २० आमदार तरी भाजप किंवा शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

शिवसेनेबरोबर जागांची तडजोड करताना आपले पारडे जड रहावे यासाठी भाजप जे निवडून येऊ शकतील असे वाटते अशांना आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या