महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

आगामी निवडणुकीत महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या हालचालींंना वेग आला आहे. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाकपच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी ही बैठक झाली.
[amazon_link asins=’B07811ZTKF,B07811Y98Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a059006c-ba74-11e8-b270-c56855f3c374′]

बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारिप बहुजन महासंघ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकभारती अशा पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक बोलवली होती.

उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याने गोरखपूर, फुलपूर आणि कैराना लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणूकीत त्यांना यश मिळालं. त्यामुळे राज्यातही असं यश मिळेल यासाठी शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी असा प्रयोग करण्याचा सल्ला दिला होता.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a90f6109-ba74-11e8-8fb8-bd82738e12ab’]

दरम्यान, या बैठकीला काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी तर भाकपच्या वतीने तुकाराम भस्मे उपस्थित होते.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.