भाजपाला फोडाफोडीचे राजकारण अंगलट आले : छगन भुजबळांचा भाजपाला टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाला फोडाफोडीचे राजकारण अंगलट आल्याचे दिसत आहे. अमळनेरमध्ये गिरीश महाजन यांना झालेली धक्काबुक्की आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली मारहाण यातूनच हे स्पष्ट होते. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, पक्षांतर्गत काही प्रश्न असतील तर ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले पाहिजेत. काल झालेला प्रकार निंदणीय आहे अशाप्रकारे कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वच राजकीय नेत्यांनी यातून धडा घेतला पाहिजे. फोडाफोडीचे राजकारण किती झाले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपाला फोडाफोडीचे राजकारण अंगलट आल्याचे दिसत आहे. अमळनेरमध्ये गिरीश महाजन यांना झालेली धक्काबुक्की आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली मारहाण यातूनच हे स्पष्ट होते. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, काल अमळनेरमध्ये भाजपच्या व्यासपीठावर झालेल्या मारहाणीच्या प्रकारात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही टीकास्त्र सोडले. गिरीश महाजन सध्या ज्या गतीने वाटचाल करत आहेत बहुदा त्यामुळे अशी परिस्थिती त्यांच्यावर आली असावी. काल भाजपाच्या जाहीर व्यासपीठावर घडलेला प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत लांच्छानास्पद आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने परिसीमा ओलांडली आहे. असे बाळासाहेब थोरात यांनी म्हंटले. याचबरोबर, काल घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ ही जास्त वेळ पाहू वाटत नाही. गिरीश महाजन बारामतीत लढायला चालले होते. मात्र गावातच त्यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी फ्री स्टाईल मारहाण मिटवायची वेळ आली असा टोलाही त्यांनी लागावला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like