आर्थिक पाहणी अहवालातले आकडे ‘बोगस’ : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील शेवटचे विधानसभा अधिवेशन मुंबईत सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला. मात्र याला विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राज्य सरकारवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारच्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांनीही याचे समर्थन करत भारताचा विकासदर २.५%नी फुगवून सांगितल्याचे मत व्यक्त केले.

महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत सोयीस्कर आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा हे सरकार आकडेवारी मांडण्यात धन्यता मानतं आहे. असा आरोप चव्हाण यांनी केला.

विरोधकांची घोषणाबाजी –

तसेच काल ज्याप्रमाणे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी आंदोलन केलं होतं. त्याचप्रकारे आजही आर्थिक अहवालातले आकडे बोगस आहेत. असं सांगत विरोधकांनी आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी घोषणाही दिल्या.

आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय

 

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन