PM मोदींच्या ‘आवाहना’नंतर विरोधकांची टीका, म्हणाले – ‘आम्हाला वाटलं होतं चुली पेटवायला सांगतील, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी कोरोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करण्यासाठी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करून, दिवे व मेणबत्ती पेटविण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या या आवाहनाला विरोधकांकडून टीका होत असताना राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशातल्या जनतेच्या हातात घोर निराशा आली आहे. वाटलं होत चूल पेटवण्यासंदर्भात काहीतरी बोलतील. मात्र त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला. अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोदींच्या या आवाहनावर जोरदार टीका केली. ‘थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम होत आहे मात्र देशाला इव्हेंटची नाही तर रुग्णालय, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांची गरज आहे. तर हातावर पोट असणारे मजूर व कामगारांना दोन वेळच जेवण मिळत नसून लोकांना दिवे लावायला सांगणं हे पंतप्रधानांच काम आहे का ? निदान अशा प्रसंगी तरी प्रधानमंत्र्यांनी गांभीर्य दाखवावं अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावत म्हणाले. “म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like