काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जागावाटप ‘ठरलं’, मित्रपक्षाला दिल्या ‘एवढ्या’ जागा, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप-शिवसेना युतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये जागावाटप निश्चीत झाले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष 125 जागांवर तर मित्र पक्ष 38 जागांवर निवडणूक लढवणार आसल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्य़क्रम लवकरच जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमिवर सर्वच पक्षांनी शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. तर भाजप-शिवसेना पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते प्रवेश करत असून या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार की नाही हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यांच्यात युती होणार की नाही यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. असे असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने आघाडीवर शिक्कामोर्तब केले असून जगा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागा लढविणार आहेत. या जागांमधील 5 ते 6 जागा अशा आहेत ज्या राष्ट्रवादीकडे असून काँग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर 5 ते 6 जागा ज्या काँग्रेसकडे आहेत त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची आदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उर्वरीत 38 जागा मित्र पक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.