विदर्भात आघाडीचे जागावाटप , काँग्रेसला ७ तर राष्ट्रवादीला ३ जागा

नागपूर : पोलीसानामा ऑनलाईन – विदर्भातील लोकसभेच्या जागावाटपाबाबतात महाआघाडीतील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. परंतू वर्धा लोकसभेच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दावा केला आहे. त्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.

विदर्भात नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेच्या युतीनं येथे काँग्रेसला हादरवले होते. तेव्हा विदर्भात भाजपनं बाजी मारली होती. आता येत्या लोसकभेत काँग्रेस आपले वर्चस्व पुन्हा मिळवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. विदर्भातील १० लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस लढणार आहे, तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे.

विदर्भात काँग्रेसच्या वाट्याचे लोकसभा मतदारसंघ

१.   नागपूर
२.   वर्धा
३.   चंद्रपूर
४.   रामटेक
५.   गडचिरोली-चिमूर
६.   अकोला
७.   यवतमाळ – वाशिम

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या जागा लढवणार

१.   भंडारा – गोंदिया
२.   बुलढाणा
३.   अमरावती