राहुल गांधी यांच्या जागेवर तरुण युवा नेत्याची नेमणूक करा : अमरिंदर सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर मोठी चर्चा झाल्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना म्हटले आहे कि, या पदावर युवा नेत्याला जबाबदारी द्यायला हवी, असे केंद्रीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या संदर्भात विधान केले आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर एखादा करिष्मा करू शकणाऱ्या युवा नेत्याची आपल्या सर्वांना गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी अनेक काँगेस नेत्यांची नावे पुढे येत आहेत. मात्र  यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्ते देखील निराश झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर तरुण अध्यक्षाची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात पुन्हा एकदा काँग्रेसच्या केंद्रीय समितीची बैठक होत असून या बैठकीत अंतरिम अध्यक्ष निवडला जाईल जोपर्यंत मुख्य अध्यक्षाची त्या जागेवर नेमणूक होत नाही.

सक्षम अध्यक्ष हवा

लोकसभा निवडणुकीतील लखनऊ मधून काँग्रेसचे उमेदवार असणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय समितीला माझी  विनंती आहे कि, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन कुणी कमजोर नेता या पदावर न बसवता सक्षम आणि पक्ष चालवू शकणारा नेता या पदावर बसवावा. यामुळे तो भाजप आणि आरएसएस बरोबर लढायची हिम्मत आणि ताकद दाखवेल.

‘स्वाभिमानी’ ने इशारा देताच तात्काळ कर्ज वाटप सुरू
लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

२०१९ ची निवडणुक ३० वर्षांतील सर्वाधिक पक्षपाती ; ६४ माजी अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणी संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर