सोनिया गांधींना पत्र लिहिणारे 23 नेते भाजपासोबत ‘एकरूप’ ? राहुल गांधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – “इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. त्या रुग्णालयात असताना असे पत्र लिहलं नाही.” अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांना फटकारलं आहे. तसेच या सर्व नेत्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचं राहुल यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस कार्यसमितीची बैठक आज पार पडली. त्यावेळी सोनिया गांधींना पत्र लिहणाऱ्या २३ नेत्यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष केल्याचं दिसलं. त्यांनी म्हटलं की, ‘इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. जेव्हा राजस्थान आणि मध्यप्रदेशात विरोधी शक्तीशी लढत होता तेव्हा सोनिया गांधी रुग्णालयात अस्वस्थ होत्या. त्यावेळी असं पत्र का नाही लिहलं गेलं? या पत्रामुळे २३ नेते भाजपसोबत एकप्रकारे हातमिळवणी केली असल्याची’ टीका राहुल गांधी यांनी केली.

कपिल सिब्बल यांचा ट्विटरवरुन उत्तर
राहुल गांधी यांनी टीका केल्यानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट ट्विट करुन उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपशी संधान साधलं. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मांडली. भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. मागील तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केलं नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतो.!’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गुलाम नबी आझाद भडकले
तर दुसरीकडे भाजपशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईल, असा पवित्रा काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नमी आझाद यांनी घेतला आहे.