Congress On Ashish Shelar | अफवा पसरवून राज्यात दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा, काँग्रेसची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Congress On Ashish Shelar | मणिपूर येथील गोहत्येची चित्रफीत (Cow Slaughter Footage) कर्नाटकची असल्याचे दाखवून माथी भडकवण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे मुंबई अध्यक्ष (BJP Mumbai President) आशिष शेलार यांना अटक (Arrest) करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. भाजपचे आशिष शेलार, नितेश राणे (Nitesh Rane) या सारखी लोकं सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोभक विधाने सातत्याने करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. (Congress On Ashish Shelar)

मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलार यांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अफवा पसरून आशिष शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी राज्यात दंगली भडकवण्याचा प्रकार केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन शेलार यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Congress Spokesperson Atul Londhe) यांनी केली आहे. (Congress On Ashish Shelar)

अतुल लोंढे म्हणाले, भाजपचा जनाधार घटत चालला आहे. मोदी-शाह यांच्या द्वेषाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकातही काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे त्यांना हे दु:ख पचवता येत नाही.वर्षभरात राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) आहेत तसेच लोकसभा निवडणुकाही (Lok Sabha Elections) होत आहेत. या निवडणुकांतही भाजपचा पराभव होणार या भीतीने ग्रासलेले भाजपमधील आशिष शेलार यांच्यासारखे नेते जनतेची माथी भडकवण्यासाठी धार्मिक मुद्यांचा आधार घेत आहेत, असा आरोप लोंढे यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी गोहत्येची चित्रफित दाखवताना त्याची खातरजमा करायला हवी होती.
मात्र तसे न करता त्यांनी जाणीवपूर्वक ती चित्रफीत दाखवून जनतेमध्ये काँग्रेसविरोधी वातावरण बनवण्याचा
हीन प्रकार केल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत अमरावती, अकोला, शेवगाव, संभाजीनगर, अहमदनगर
आणि त्र्यंबकेश्वर येथे जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याच काम भाजप व संलग्न संघटना करत असल्याचा
आरोप लोंढे यांनी केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) हे केवळ विरोधकांवर
व कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करतात मात्र, स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याचे अतुल लोंढे म्हणाले.

राज्यात दंगली भडकवून राजकीय पोळी भाजण्याचा डाव भाजपचा असून अशा प्रकारांना वेळीच रोखले पाहिजे.
यासाठी काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट घेतल्याचे लोंढे यांनी सांगितले.
मात्र पोलीस चिथावणीखोर विधाने करणाऱ्या भाजप नेत्यांच्याविरोधात कारवाई करताना दिसत नाहीत.
राज्य सरकार व पोलिसांनी अशा प्रकारांना आळा घालावा, भाजपचे असेल प्रकार काँग्रेस खपवून घेणार नाही,
असा इशारा लोंढे यांनी दिला.

Web Title :  Congress On Ashish Shelar | maharashtra congress demand filed fir against bjp leader ashish shelar for provoke riots in state showing misleading

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे

Pune Crime News | Plunge – All Day Kitchen and Bar Pub चा Owner Jitesh Mehta पदेशात? 3 सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीत 4 दिवसांची वाढ; पैशांच्या देवाण-घेवाणीसाठी G-Pay, UPI चा प्रचंड वापर, अनेक व्यापारी ‘रडार’वर

News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !