Congress On Maharashtra Law & Order | राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पुण्यासह राज्याची बदनामी होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Congress
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Congress On Maharashtra Law & Order | राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सरकारला त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याची देशात बदनामी होत आहे अशा शब्दात काँग्रेसने राज्यातील महायुती सरकारला (Mahayuti Govt) लक्ष्य केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघांची आढावा बैठक घेण्यासाठी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते आज (दि.४) पुण्यात आले होते.(Congress On Maharashtra Law & Order)

काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. बैठकीपूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना चेन्नीथला, वडेट्टीवार, पटोले यांनी महायुती सरकारला लक्ष्य करीत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.

राज्यात कायदा, सुव्यवस्था नावालाही शिल्लक राहिलेली नाही. दिवसाढवळ्या खून होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांमधील गुन्हेगार खुले आम फिरत आहेत. या सर्व दुरावस्थेला सरकारच जबाबदार आहे असे चेन्नीथला म्हणाले. सरकारचा पोलीस, प्रशासन यांच्यावर कसलाही वचक राहिलेला नाही. त्यातूनच असे प्रकार होत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वडेट्टीवार व पटोले यांनी हे सरकार फक्त वसुली सरकार आहे असा आरोप केला. महिला अत्याचार, मालवणातील शिवछत्रपतींचा पुतळा पडला.
याविरोधात आम्हाला आंदोलन करायला बंदी घातली. दुसरीकडे सर्व गुन्हे प्रकरणातील आरोपी मोकळे फिरत आहेत.
ही स्थिती राज्यात कधीही नव्हती असे पटोले म्हणाले.

सर्व यंत्रणा जवळ असताना सरकारमधील पक्षच आंदोलन करतात असेही राज्यात कधी नव्हते.
सरकारला फक्त पैसा कसा व कशातून मिळेल हेच पडले आहे.
मागील ७ वर्षात निघाले नसतील इतक्या निविदा या सरकारने मागील दोन वर्षात काढल्या असे पटोले म्हणाले.

खासदार प्रणिती शिंदे, आमदार संग्राम थोपटे, रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आबा बागूल,
सरचिटणीस अँड. अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संगिता तिवारी यावेळी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीसाठी आले होते. पटोले, वडेट्टीवार यांनी त्यांच्या जिल्हा व शहरनिहाय बैठका घेतल्या व त्यांच्या मतदार संघातील पक्षाच्या कामाविषयी सुचना दिल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | हडपसर: मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही केल्याने ज्येष्ठाचे अपहरण करुन बेदम मारहाण; 7 जणांवर गुन्हा दाखल

Dhananjay Munde On Sharad Pawar | शरद पवारांच्या टीकेला मंत्री धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ” महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला…”

Total
0
Shares
Related Posts