विखे पाटलांवर काय होणार कारवाई ? राहुल गांधी, बाळासाहेब थोरातांमध्ये खलबतं 

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन – राधाकृष्ण विखे पाटील यांची पक्षविरोधी भूमिका बघता त्यांच्यावर कोणती कारवाई करायची ? याबाबत खलबतं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात  यांच्यात झाल्या असल्याच्या चर्चा आहेत. संगमनेर येथील सभा पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी बाळासाहेब थोरात यांच्या घरी मुक्काम केला. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. तसेच या दोघांमध्ये विखे पाटील यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेवर देखील चर्चा झाल्याचे समजते आहे. राहुल गांधी आता विखे पाटलांवर कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरात आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. अहमदनगरमध्ये एकीकडे विखे पाटील तर दुसरीकडे थोरात अशी २ मोठे प्रस्थ आहेत. या दोघांनाही मानणारा एक ठराविक वर्ग आहे. विखे आणि थोरात या दोन एकाच पक्षातील  राजकीय व्यक्तींच्या अहमदनगरमध्ये जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

राधाकृष्ण विखेंनी ‘हात’ सोडला, आता कोणता झेंडा ‘हाती’ ?

मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आज काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राधाकृष्ण विखे शिवसेनेच्या मंचावर 
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव किसन लोखंडे यांच्या व्यासपीठावर राधाकृष्ण विखे पाटील दिसून आले. लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या व्यासपीठावरील फ्लेक्सवर विखेंचा फोटो दिसून आल्याने आणखी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मुलगा सुजय यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्येच प्रवेश करणार ? की शिवसेनेमध्ये हे अद्याप समजू शकलेले नाही.
राधाकृष्ण विखेंना कारणे दाखवा नोटीस 
विखे पाटलांचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वीकारला आहे. आता विखे पाटलांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशोक चव्हाण यांनी ही नोटिस बजावली आहे. विखे पाटलांना पक्षविरोधी भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विखे पाटील यांच्या विरोधात पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या अनेक तक्रारी असल्याचे बोलले जात आहे.