काँग्रेसच्या ‘या’ प्रवक्त्या करणार ‘सपा’ नेत्याशी ‘लग्न’, 1 डिसेंबरला ‘सप्तपदी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आमदार अदिती सिंहनंतर आता समाजवादी पार्टीच्या माजी प्रवक्ता आणि काँग्रेसच्या मीडिया पॅनलिस्ट पंखुडी पाठक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नोएडाचे रहिवासी अनिल यादव यांच्यासोबत पंखुडी लग्न करणार आहेत. अनिल समाजवादी पार्टीचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ते जवळचे मानले जातात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघंही 1 डिसेंबर रोजी दिल्लीतील वसुंधरा वाटिकामध्ये लग्न करणार आहेत. पंखुडी पाठक लव्ह मॅरेज करत असल्याचं समजत आहे. दोघांच्या घरच्यांचीही लग्नाला परवानगी असल्याचं म्हटलं जात आहे. या लग्न सोहळ्यात सपा आणि काँग्रेसेचे अनेक नेते येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या मीडिया पॅनलिस्ट पंखुडी यांनी दिल्ली विद्यापीठातून लॉचं शिक्षण घेतलं आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान सपानं त्यांना पक्षाच्या प्रवक्ता म्हणून नियुक्त केलं होतं. त्यांनी समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेची निवडणूकही लढवली आहे. त्यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही.

ऑगस्ट 2018 मध्ये सपानं पॅनलिस्टची यादी जारी केली. यात पंखुडी यांचं नाव नव्हतं. यानंतर त्यांनी पार्टीला रामराम ठोकला. त्यांनी पार्टीतील काही नेत्यांवर धर्म आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव केल्याचा आरोपही केला होता.

सपा नेता से शादी रचा रही हैं कांग्रेस की प्रवक्ता, 1 दिसंबर को लेंगी सात फेरे

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या अदिती सिंह यांनीही लग्न केलं होतं. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतील काँग्रेसच्या आमदार अदिती सिंहांनी 21 नोव्हेंबर रोजी पंजाब काँग्रेसचे नेते अंगद सिंह सैनीसोबत लग्न केलं होतं.
सपा नेता से शादी रचा रही हैं कांग्रेस की प्रवक्ता, 1 दिसंबर को लेंगी सात फेरे

Visit : Policenama.com