काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष, ‘या’ माजी मुख्यमंत्र्याचा पक्षाला घरचा ‘आहेर’

दिल्ली  : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन केल्यानंतर अजूनही काँग्रेसची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि गोव्यामध्ये काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही तर दुसरीकडे संजय सिंग, भुनेश्वर कलिता या रज्यसभेच्या खासदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. दरम्यान काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्यात आले. यावेळी देखील पक्षातील मतभेद समोर आले आहे. असे असताना आता हरियाणामध्ये पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा हे पक्ष सोडण्याच्या तयारी असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर आज (रविवार) रोहतक येथे शक्तिप्रदर्शन करत पक्षालाच त्यांनी खडे बोल सुनावले. काँग्रेस रस्ता भरकटला असे म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. कलम ३७० हटवण्यास माझे समर्थन होते मात्र, पक्षातील काही नेते त्याच्या विरोधात होते असे ही त्यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी सरकार एखादा योग्य निर्णय घेत असेल तर त्याला समर्थन करणे गरजेचे आहे. आपल्या अनेक सहकार्यांनी कलम ३७० हटवण्यास विरोध केला. यावरूनच पक्ष भरकटला असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत कधीही स्वाभिमान आणि देशभक्तीची वेळ येईल त्यावेळी मी कधीही मागे-पुढे पाहणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like