काय सांगता ! होय, काँग्रेसच्या सभेत चक्क प्रियंका ‘चोपडा’ झिंदाबादच्या ‘घोषणा’ ( व्हिडीओ )

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बॉलीवूडच्या स्टारचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यात कोणाला आर्श्चय वाटणार नाही़ पण, हे आकर्षण नको तेथे प्रकट झाले तर पंचाईत होते. दिल्लीत काँग्रेसच्या जाहीर सभेत पक्षाच्या एक नेते सुरेंद्र कुमार यांचा अतिउत्साह त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. या सभेत त्यांनी माईक हातात घेऊन सोनिया गांधी झिंदाबाद, काँग्रेस पार्टी झिंदाबाद, राहुल गांधी झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. इथपर्यंत सर्व काही ठिक होते.

मात्र, त्यानंतर त्यांनी जी घोषणा दिली त्यामुळे मंचावरील नेते ही गडबडून गेले. राहुल गांधी झिंदाबाद नंतर त्यांनी चक्क बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा झिंदाबाद अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने सर्वच जण गडबडून गेले. हा व्हिडिओ तातडीने व्हायरल झाला असून त्यावरुन सोशल मिडियावर काँग्रेसला ट्रोल करायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंचावरील दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा हेही उपस्थित होते.

एएनआय ने हा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर त्यावरुन सोशल मिडियावर काँग्रेसला ट्रोल करण्याची संधी काँग्रेस विरोधकांनी सोडली नाही. अमित शहा यांना तोंडावर राहुल बजाज यांनी सुनावले होते. याचा संदर्भ घेऊन एकाने सोशल मिडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे की, नशीब या सभेला राहुल गांधी नव्हते. नाही तर राहुल गांधी ऐवजी राहुल बजाज अशी घोषणा ऐकायला मिळाली असती़ तर, दुसऱ्याने प्रियंका चोपडाने काँग्रेसमध्ये कधी प्रवेश केला असा प्रश्न केला आहे.

Visit : policenama.com