‘तोडफोड’ करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते, पण ‘त्या’बाबत तपासणी करावी लागेल : आ. संग्राम थोपटे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद डावल्याने काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती. मात्र, तोडफोड करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील मात्र ते माझे कार्यकर्ते आहेत की नाही, याची तपासणी करावी लागेल असे आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे तोडफोड करणारे कार्यकर्ते नेमके कोणाचे होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंगळवारी शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनाची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणारे आमचेच कार्यकर्ते होते का हे स्पष्ट नाही. ही तोडफोड कुणी केली याचा तपास करणार असल्याचे सांगून ते कार्यकर्ते माझे नसल्याचे संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्ही अंतिम मानतो. कालची घटना काँग्रेस पक्षाला शोभणारी नाही. पक्षाला जे योग्य वाटलं तोच निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी काँग्रेसला एखादे मंत्रिपद देण्याची अपेक्षा होती. गुंडगिरी आणि चुकीच्या प्रकराला पक्षात थारा नाही, असे सांगत आमदार थोपटे यांनी कालच्या प्रकराचा निषेध केला आहे. मागील तीन टर्म मी आमदार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सहाजिकच अपेक्षा असते.

नेता घडवण्यासाठी कार्यकर्ते रक्ताचे पाणी करतात. त्यामुळे माझा नेता विधानसभेत जावा ही माफक अपेक्षा कार्यकर्त्यांना असते. मात्र कालची घटना निंदनीय आहे, अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही असेही संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/