कर्नाटक राज्यपालांच्या भूमिकेविरोधात पुण्यात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कर्नाटक राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून काही जागा दुर राहून देखील राज्यपाल विजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले. त्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील बेलबाग चौकात राज्यपाल्याच्या भूमिके विरोधात माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आजी माजी पदाधिकायांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, कर्नाटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस एकत्रित येत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग असताना. राज्यपाल विजुभाई वाला यांनी भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरत असताना. भाजपला सत्ता स्थापन करण्यास आमंत्रण दिले. ही निषेधार्थ बाब असून राज्यपालानी लोकशाही धोक्यात आणली आहे. अशा शब्दात त्यांनी यावेळी टीका केली. या सर्व घडामोडी मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असून त्यांचा देखील त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला.