पूरपरिस्थिती असताना सरकार ‘मौज-मस्ती’ करत होतं : बाळासाहेब थोरात

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – महापूराची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं असून ज्या दिवशीत सांगली पाण्यात बुडत होती. ज्या दिवशी ब्रम्हणाळ्यात होडी बुडाली त्या दिवशी हे सरकार मौज मजा करत होतं. असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला सुरुवात झाली असून अमरावती येथे झालेल्या सभेत बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सरकारवर टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की , ‘महापूराची परिस्थिती हाताळण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं असून ज्या दिवशीत सांगली पाण्यात बुडत होती, ज्या दिवशी ब्रम्हणाळ्यात होडी बुडाली. त्या दिवशी हे सरकार मौज मजा करत होतं. हे सरकार घोषणा करण्यात पटाईत असून शेतकऱ्यांना अजुनही विमा मिळाला नाही. 2005-06 साली काँग्रेस सरकारने नियोजन केलं म्हणून पूर परिस्थिती नियंत्रणात होती. नंतर नियोजनाचे बारा वाजले. हे सरकार केवळ चार भांडवल दारांचं सरकार आहे सगळे वाहन उद्योग मंदावले आहेत. मंदीचा विळखा वाढतोय. वस्त्रोद्योग डबघाईला गेला, मात्र सरकार काहीच करत नाही.’

महापुरादरम्यान सेल्फी व्हिडिओ काढणारे गिरीश महाजन हे जोकरमंत्री : नाना पटोले

मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला 50 कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे. अलमट्टी धरणामुळे सांगली, कोल्हापूरवर पुराची स्थिती ओढवली. महापुरादरम्यान सेल्फी व्हिडिओ काढणारे गिरीश महाजन हे जोकरमंत्री आहेत. अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सभेदरम्यान केली.

महापर्दाफाश यात्रा –

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा सुरु केली असून, यात्रेच्या माध्यमातून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम भाजपची मंडळी करीत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांची पोलखोल करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –