मला ‘सर’ नाही फक्त ‘राहुल’ म्हणा : राहुल गांधी

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी चेन्नईच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावेळी त्यांनी स्टेला मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांशी गप्पा मरताना त्यांचा एक मजेशिर व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना यावेळी अनेक प्रश्न केले. प्रश्न विचारताना साहजिकच सर्वजण राहुल गांधींशी बोलताना आदरार्थी उल्लेख करून बोलत होते. तसंच त्यावेळी एका विद्यार्थिनी राहुल यांना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली. तिने बोलताना सर बोलत प्रश्नाला सुरुवात केली. त्यावर राहुल गांधींनी तिला थांबवले आणि तुम्ही मला सर ऐवजी फक्त राहुल म्हणा, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

त्यानंतर मात्र या विद्यार्थिनीचा राहुल गांधी यांना एकेरी आवाज देण्याची हिम्मत होत नव्हती. अखेर या विद्यार्थिनीने कसाबसा धीर गोळा करत राहुल यांना एकेरी हाक मारली आणि आपला प्रश्न विचारला. कार्यक्रमात या प्रसंगामुळे रंगत आली.

दरम्यान, सध्या या प्रसंगाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राहुल गांधींनी नेहमीसारखी वेशभूषा न करता टी-शर्ट आणि जीन्स असे कपडे घातले होते. आपल्या या कृतीने त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे हे लुक पूर्वीही लोकांनी पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी राहूल गांधी सोनिया गांधींसोबत गोव्यात सुट्टीला गेले होते. तेव्हा ते सामान्य लोकासारखे वावरत होते. तसंच त्यावेळी त्यांनी तेथील सामान्य लोकांसोबत फोटो काढले होते.

You might also like