‘त्या’ फोटोग्राफरची विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज विमानानं भुवनेश्वरला पोहोचले. आज ते ओडिसाच्या दौऱ्यावर आहेत. याचसाठी ते भुवनेश्वरमध्ये दाखल झाले. यावेळी तेथे अनेक लोक होते. याचदरम्यान तेथील एक फोटोग्राफर तीन फुटांवरुन पायऱ्यांवरून खाली पडला. राहुल गांधी यांनी मागे वळून पाहिले असता त्यांनी फोटोग्राफर पडल्याचे पाहिले यानंतर मात्र राहुल गांधी लगेचच फोटोग्राफरची विचारपूस करण्यासाठी धावले. राहुल यांनी फोटोग्राफरची विचारपूस केली आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रमांसाठी पुढे रवाना झाले. या प्रसंगाचा व्हिडीओ ही समोर आला आहे.


नेमके काय झाल

राहुल गांधी ओडिसा दौऱ्यासाठी भुवनेश्वरमधील विमानतळावर उतरले. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि फोटोग्राफर्सची मोठी गर्दी होती. याच दरम्यान त्यातील एक फोटोग्राफर जवळपास तीन-साडेतीन फुटांवरुन खाली पडला. हे पाहून बाकी लोकांनी त्याच्याजवळ धाव घेतली. राहुल गांधी पुढे निघतच होते इतक्यात त्यांनी मागे वळून पाहिले. यावेळी राहुल गांधींच्या आसपास विशेष सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गराडा होता. मात्र फोटोग्राफर खाली कोसळल्याचं पाहताच राहुल या गराड्यातून बाहेर पडले आणि फोटोग्राफरजवळ पोहोचले. त्यांनी त्या फोटोग्राफरची विचारपूस केली. त्यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी विमानतळावरुन रवाना झाले.ओडिसात लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होणार आहे. राहुल गांधी आज ओडिसात जनसभेला संबोधित करणार आहेत. या माध्यमातून ते निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. गेल्या काही दिवसात ओडिसात काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली आहे. दोन आमदारांसह अनेक वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसला रामराम केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला बळकटी देण्याची कामगिरी राहुल यांना पार पाडावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा ओडिसाचे दौरे केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेत राहुल गांधी या दौऱ्याच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत.